राज्य प्रशिक्षण धोरणानुसार जिल्हयातील शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनासाठी गरजाभिमुख व मागणीनुसार प्रशिक्षण उपक्रमांची वार्षिक दिनदर्शिका विकसित करुन प्रभावी अंमलबजावणी करणे.

विद्यार्थी संपादणूक चाचणी, शासकीय व अशासकीय संस्थांनी केलेली सर्वेक्षणे यावरुन जिल्हयाची शैक्षणिक सद्यस्थिती विश्लेषण करुन आवश्यकतेनुसार जिल्हास्तरीय कृतिकार्यक्रमांची निर्मिती व अंमलबजावणी करणे.

देशपातळीवरील, राज्यपातळीवरील, विविध शैक्षणिक संशोधने यांच्या निष्कर्षानुसार जिल्हयात शैक्षणिक कृतिकार्यक्रमांची रचना करणे. जिल्हयातील शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनासाठी शैक्षणिक संशोधन करणे.

जिल्हयातील शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी विविध पातळयांवरील क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या नियमित नियोजन व आढावा बैठका घेवून गुणवत्ता विषयक कामकाज आढावा, मार्गदर्शन व सहाय्य करणे.

विविध शासकीय व अशासकीय संस्था (NGO) यांच्या सहकार्याने शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाचे विविध उपक्रम राबविणे.

महाराष्ट्र विद्या प्राधिकरण व प्रादेशिक विद्या प्राधिकरण यांचेकडील निर्देशाप्रमाणे जिल्हयातील पूर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च् माध्यमिक शिक्षणाच्या सक्षमीकरणासाठी शिखर संस्था म्हणून निर्धारित केलेली व जिल्हयाची शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनासाठी आवश्यक कृतिकार्यक्रम राबविणे व अनुषंगिक सर्व शैक्षणिक व प्रशासनिक कार्ये करणे.

विविध प्रशिक्षणे प्रभावी व्यवस्थापन, नियोजन व अनुधावन करुन जिल्हयातील शिक्षक, क्षेत्रिय अधिकारी यांचे सक्षमीकरण करण्यासाठी कार्य करणे.

शिक्षणाच्या गरजा लक्षात घेता प्रशिक्षणाच्या पध्दती (Traning Methodolgy) कालावधी (Duration) निवासी/अनिवासी इ.निश्चित करणे.

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी गटसाधन केंद्र (BRC) व समूह साधन केंद्र (CRC) व शहरसाधन केंद्रे (URC) मधील मनुष्यबळाचे क्षमता संवर्धन व सनियंत्रण करणे.

विविध शैक्षणिक अध्ययन अनुभव, शैक्षणिक यशोगाथा, प्रयोग यांचे आदान-प्रदान करण्यासाठी शैक्षणिक संस्कृती विकसित करणे.

शिक्षक व क्षेत्रिय अधिकारी यांच्या व्यावसायिक विकासासाठी प्रशिक्षण कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे.

जिल्हयातील सेवापूर्व प्रशिक्षणाची गुणवत्ता संवर्धन व सनियंत्रण करणे.

शिक्षक, अधिकारी/कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाच्या गरजा (Training Need) निश्चित करणे.

जिल्हयातील 100 टक्के मुलांची (CWSN सह) पटनोंदणी व उपस्थिती याकरिता शाळांमध्ये अध्ययनपूरक वातावरण निर्माण करणे.

जिल्हयातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी श्रेणीनुसार कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे.

प्रत्येक कार्यक्रमासाठी आवश्यक तो उत्कृष्ट दर्जाचा अद्ययावत साधनसामुग्री (Course Material) तयार करुन घेणे.

उत्कृष्ट व दर्जेदार प्रशिक्षक (Master Trainers) शोधणे व तयार करणे इ. त्यांचे गुणवत्ता व योग्यतेनुसार वर्गीकरण करणे इ.

प्रशिक्षणाचे वार्षिक वेळापत्रक (Annual Calender) तयार करुन दर्जेदार व प्रभावी प्रशिक्षण उपलब्ध करुन घेणे.