Objectives

विभागाकडून करण्यात येणारी कामे

जिल्हयातील 100 टक्के मुलांची (CWSN सह) पटनोंदणी व उपस्थिती याकरिता शाळांमध्ये अध्ययनपूरक वातावरण निर्माण करणे.

राज्य प्रशिक्षण धोरणानुसार जिल्हयातील शैक्षणिक गुणवत्तासंवर्धनासाठी गरजाभिमुख व मागणीनुसार प्रशिक्षण उपक्रमांची वार्षिक दिनदर्शिका विकसित करुन प्रभावी अंमलबजावणी करणे.

विद्यार्थी संपादणूक चाचणी, शासकीय व अशासकीय संस्थांनी केलेली सर्वेक्षणे यावरुन जिल्हयाची शैक्षणिक सद्यस्थिती विश्लेषण करुन आवश्यकतेनुसार जिल्हास्तरीय कृतिकार्यक्रमांची निर्मिती व अंमलबजावणी करणे.

देशपातळीवरील, राज्यपातळीवरील, विविध शैक्षणिक संशोधने यांच्या निष्कर्षानुसार जिल्हयात शैक्षणिक कृतिकार्यक्रमांची रचना करणे. जिल्हयातील शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनासाठी शैक्षणिक संशोधन करणे.

जिल्हयातील सेवापूर्व प्रशिक्षणाची गुणवत्ता संवर्धन व सनियंत्रण करणे.

शिक्षक व क्षेत्रिय अधिकारी यांच्या व्यावसायिक विकासासाठी प्रशिक्षण कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे.

विविध शैक्षणिक अध्ययन अनुभव, शैक्षणिक यशोगाथा, प्रयोग यांचे आदान-प्रदान करण्यासाठी शैक्षणिक संस्कृती विकसित करणे.

जिल्हयातील शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी विविध पातळयांवरील क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या नियमित नियोजन व आढावा बैठका घेवून गुणवत्ता विषयक कामकाज आढावा, मार्गदर्शन व सहाय्य करणे.

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी गटसाधनकेंद्र (BRC) व समूहसाधनकेंद्र (CRC) व शहरसाधनकेंद्रे (URC) मधील मनुष्यबळाचे क्षमता संवर्धन व सनियंत्रण करणे.

महाराष्ट्र विद्या प्राधिकरण व प्रादेशिक विद्या प्राधिकरण यांचेकडील निर्देशाप्रमाणे जिल्हयातील पूर्वप्राथमिक, माध्यमिक व उच्च् माध्यमिक शिक्षणाच्या सक्षमीकरणासाठी शिखर संस्था म्हणून निर्धारित केलेली व जिल्हयाची शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनासाठी आवश्यक कृतिकार्यक्रम राबविणे व अनुषंगिक सर्व शैक्षणिक व प्रशासनिक कार्ये करणे.

जिल्हयातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी श्रेणी नुसार कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे.

विविध प्रशिक्षणे प्रभावी व्यवस्थापन, नियोजन व अनुधावन करुन जिल्हयातील शिक्षक, क्षेत्रिय अधिकारी यांचे सक्षमीकरण करण्यासाठी कार्य करणे.

विविध शासकीय व अशासकीय संस्था (NGO) यांच्या सहकार्याने शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाचे विविध उपक्रम राबविणे.

शिक्षक, अधिकारी/कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाच्या गरजा (Training Need) निश्चित करणे.

शिक्षणाच्या गरजा लक्षात घेता प्रशिक्षणाच्या पध्दती (TraningMethodolgy) कालावधी (Duration) निवासी/अनिवासी इ. निश्चित करणे.

प्रत्येक कार्यक्रमासाठी आवश्यक तो उत्कृष्ट दर्जाचा अद्ययावत साधनसामुग्री (Course Material) तयार करुन घेणे.

उत्कृष्ट व दर्जेदार प्रशिक्षक (Master Trainers) शोधणे व तयार करणे इ. त्यांचे गुणवत्ता व योग्यतेनुसार वर्गीकरण करणे इ.

प्रशिक्षणाचे वार्षिक वेळापत्रक (Annual Calender) तयार करुन दर्जेदार व प्रभावी प्रशिक्षण उपलब्ध करुन घेणे.