Charter of Citizen

नागरिकांची सनद २०२४

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव

नागरिकांची सनद

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 अन्वये शिक्षकांना सेवापूर्व व सेवांतर्गत प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्याबाबत धोरण ठरविण्यात आले. मनुष्यबळ विकासाचे एक प्रभावी साधन म्हणून शिक्षण ही बाब अत्यंत महत्वपूर्ण ठरते. 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण पुरविणे हे शासनाचे घटनात्मक दायित्व आहे. महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शिक्षणाचे नेतृत्व करणारी जिल्हास्तरीय संस्था म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) अस्तित्वात आली. या संस्थेची प्रमुख जबाबदारी शिक्षकांचे प्रशिक्षण घेणे, उत्तम दर्जाचे शिक्षक निर्माण करणे व जिल्ह्यातील शिक्षणाची गुणवत्ता संवर्धन करणे. महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई शासन निर्णय क्रमांक पीटीसी 1096/(173/96)/माशि-4 दि. 8 ऑक्टोबर 1996 अन्वये जिल्ह्यातील शासकीय अध्यापक विद्यालयाचे उच्चीकरण करून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव या संस्थेची स्थापना करण्यात आली.