Cabinet Minister for School Education
Principal Secretary, School Education and Sports Department, Maharashtra
Commissioner (Education), Maharashtra
State Project Director, MPSP, Mumbai
Director, State Council of Educational Research and Training, Maharashtra, Pune
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 अन्वये शिक्षकांना सेवापूर्व व सेवांतर्गत प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्याबाबत धोरण ठरविण्यात आले. मनुष्यबळ विकासाचे एक प्रभावी साधन म्हणून शिक्षण ही बाब अत्यंत महत्वपूर्ण ठरते. 6 ते 14 वयोगटातील सर्वमुलांना प्राथमिक शिक्षण पुरविणे हे शासनाचे घटनात्मक दायित्व आहे. महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शिक्षणाचे नेतृत्व करणारी जिल्हास्तरीय संस्था म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) अस्तित्वात आली. यासंस्थेची प्रमुख जबाबदारी शिक्षकांचे प्रशिक्षण घेणे, उत्तम दर्जाचे शिक्षक निर्माण करणे व जिल्ह्यातील शिक्षणाची गुणवत्ता संवर्धन करणे. महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई शासन निर्णय क्रमांक पीटीसी 1096/(173/96)/माशि-4 दि. 8 ऑक्टोबर 1996 अन्वये जिल्ह्यातील शासकीय अध्यापक विद्यालयाचे उच्चीकरण करून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव या संस्थेची स्थापना करण्यात आली.
Building generation of excellent teachers to provide quality education with a spirit of service and higher values.
राज्य प्रशिक्षण धोरणानुसार जिल्हयातील शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनासाठी गरजाभिमुख व मागणीनुसार प्रशिक्षण उपक्रमांची वार्षिक दिनदर्शिका विकसित करुन प्रभावी अंमलबजावणी करणे.
विद्यार्थी संपादणूक चाचणी, शासकीय व अशासकीय संस्थांनी केलेली सर्वेक्षणे यावरुन जिल्हयाची शैक्षणिक सद्यस्थिती विश्लेषण करुन आवश्यकतेनुसार जिल्हास्तरीय कृतिकार्यक्रमांची निर्मिती व अंमलबजावणी
देशपातळीवरील, राज्यपातळीवरील, विविध शैक्षणिक संशोधने यांच्या निष्कर्षानुसार जिल्हयात शैक्षणिक कृतिकार्यक्रमांची रचना करणे. जिल्हयातील शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनासाठी शैक्षणिक संशोधन करणे.
Read Moreराज्य प्रशिक्षण
प्रिय शिक्षक व पालक बंधू भगिनींनो, नमस्कार् .
आमच्या दृष्टीने आपण विद्यार्थ्यांच्या रूपातून राष्ट्र घडविण्यास मोलाची भूमिका बजावणारे खरे शिलेदार आहात. आपण मुलाच्या शिक्षणासाठी आपले विचार व कृतियुक्त योगदान देत आहात याचा आम्हास अभिमान आहे. आपले विचार, नाविन्यपूर्ण कृती-उपक्रम यांचा लाभ इतर शिक्षक बंधू-भगिनी, पालक व विद्यार्थी यांच्या पर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही आपल्या सोबत आहोत. शासनाच्या निर्देशानुसार, जिल्हास्तरीय शिखर संस्था या नात्याने शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षणाची समान संधी प्राप्त करून देण्यासाठी, त्यांना समतेकडून समृद्धीकडे घेवून जाण्यासाठी आपण सर्वजण सातत्याने प्रयत्नरत राहू. मला खात्री आहे, आपल्या सर्वांच्या सामूहीक प्रयत्नांतून आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक बालकांच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावत राहील. त्यासाठी आपणास डायट जळगाव परिवारातर्फे मनापासून हार्दिक शुभेच्छा...
डॉ अनिल झोपे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव